मी माझ्या पाल्याला इको-फ्रेंडली गणेशा कार्यशाळेत सहभागी होण्यास संमती देत आहे.
कार्यशाळा संपल्यानंतर सायंकाळी ४.०० वाजता माझ्या पाल्याला घेण्यासाठी मी महाविद्यालयात उपस्थित राहीन.
महत्त्वाच्या सूचना व नियमावली
- प्रत्येक विद्यार्थ्याने कार्यशाळेदरम्यान केवळ एकच गणपती मूर्ती तयार करावी.
- गणपती मूर्ती तयार करण्यासाठी आवश्यक माती (Clay) आयोजकांकडून उपलब्ध करून दिली जाईल.
- कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी (Online Registration) करणे अनिवार्य आहे.
- विद्यार्थ्यांनी तयार केलेली गणपती मूर्ती कार्यशाळा पूर्ण झाल्यानंतर सोबत घरी घेऊन जाता येईल.
- पालकांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात सोडून सायंकाळी ४.०० वाजता विद्यार्थ्यांना घेण्यासाठी महाविद्यालयात यावे.
- प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेचे / महाविद्यालयाचे ओळखपत्र (I-Card) सोबत आणणे आवश्यक आहे.
- नोंदणी करताना दिलेली सर्व माहिती अचूक असणे आवश्यक आहे.
- कार्यशाळेदरम्यान प्रशिक्षक व आयोजक यांच्या सर्व सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
- कार्यशाळेच्या परिसरात स्वच्छता व शिस्त राखणे ही प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याची जबाबदारी आहे.
- कार्यशाळेची फी ₹३००/- आहे. नोंदणी निश्चित करण्यासाठी शुल्क भरणे आवश्यक आहे.
- कार्यशाळेत वापरण्यात येणारी साधने व साहित्य काळजीपूर्वक हाताळावे.
- वरील सर्व नियम व अटी मला मान्य असून मी त्यांचे पालन करेन.